Breaking News

माजी खा.निवेदिता माने यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी बुधवारी आपला मुलगा धैर्यशीलसह शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यांचा हा शिवसेना प्रवेश म्हणजे राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवेदिता माने खासदार झालेल्या आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माने कुटुंबाची नाळ ही गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळलेली होती. पण हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्वाभिमानीला म्हणजेच राजू शेट्टींना पाठिंबा देणार असल्याने माने कुटुंब नाराज होते. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, रुकडी, इचलकरंजी भागात माने कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आहे. धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने यांनी यापूर्वी दोनदा हातकणंगले मतदारसंघात खासदारपद भूषवले आहे. गेल्या अनेक सर्षांपासून हे कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होतं. पण हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींचं वाढतं प्रस्थ लक्षात घेऊन माजी खासदार निवेदीता माने आणि त्यांच्या मुलगा धैर्यशील माने यांनी आज मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश घेतला.