Breaking News

सिरसमार्ग येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शाखा स्थापन, भाजपा-सेनेच्या सरकारला आता रिमुव्ह करा-नागरे


गेवराई, (प्रतिनिधी) अच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली. महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले. शेतकरी देशोधडीला लागला. शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली. या दळभद्री भाजपा- सेनेच्या सरकारला युवकांनी सत्तेत बसवले ते स्वतः लेफ्ट होणार नाहीत तर येणार्‍या २०१९ मध्ये आपल्याला त्यांना रिमुह करावे लागणार आहे, असे प्रतिपादन सुभाष महाराज नागरे यांनी केले. गेवराई तालुक्यातील मौजे सिरसमार्ग येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शाखा स्थापन कार्यक्रमात ते बोलत होते. 


गेवराई तालुक्यातील मौजे सिरसमार्ग येथे सोमवार दि.२६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शाखेचेे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष महाराज नागरे, माजी जि.प. सदस्य जालींदर पिसाळ, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्ता दाभाडे, नगरसेवक शाम येवले, माजी नगरसेवक गोरक्ष शिंदे, माजी सभापती पांडुरंग कोळेकर, पांडुरंग गाडे, जयभवानी कारखाना संचालक राजेंद्र वारंगे जिल्हा बँकेचे संचालक कैलाश नलावडे, पं. स. सदस्य जयसिंग जाधव, संभाजी पवळ, सुरेश (पापा) लोंढे, विकास सानप, धुराजी महाराज कोळेकर, अल्पसंख्याक सेलचे नविद मशाएक, वसिम फारोकी, अँड. आनंद सुतार, बब्बु बारुदवाले, सुधाकर वादे, संदीप मडके आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना नागरे महाराज म्हणाले की, विजयसिंह पंडित हे आमच्या संघाचे कर्णधार आहेत.