नगरसेवक विशाल जाधव यांना निलंबित करा : मोरे


सातारा (प्रतिनिधी) : सातारा शहरातील प्रभाग क्र. 3 मधून सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आले आहेत. जेव्हापासून ते या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत तेव्हापासून त्यांची भूमिका वादग्रस्त, गैरवर्तणुकीची राहिली आहे. त्यांची गैरवर्तणूक पाहता लोकसेवक नियमाखाली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच यासंदर्भात चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनत्यांनी दिलेल्या निवेदनात, 
सातारा शहरातील प्रभाग 3 मधून विशाल जाधव हे 2016-2021 या कालावधीसाठी निवडून आले आहेत. 

जेव्हापासून ते या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. तेव्हापासून त्यांची भूमिका वादग्रस्त, गैरवर्तणुकीची राहिलेली आहे. मध्यंतरीच्या काळात प्रभागातील कचरा उचलणार्‍या घंटागाडी चालकाला नाहक त्रास दिल्यामुळे या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नंतरच्या काळात प्रभागातील कचरा ट्रॅक्टरमध्ये भरुन तो सातारा शहर नगरपरिषदेच्या मुख्य व्दाराजवळ रस्त्यावर टाकण्यात आला होता. त्यावेळीसुध्दा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात केली होती. दोन-तीन दिवसांपूर्वी सदरबझार भागासाठी साफसफाईसाठी नियुक्ती केलेल्या मुकादमास दमदाटी, शिवीगाळ करुन, हजेरी मशीन फोडून टाकून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे. त्यासंदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल होऊन आयपीसी कलम 353 व इतर कलमे त्यांच्यावर नोंदवलेली आहेत. 

विशाल जाधव यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत व त्यांची गैरवर्तणूक पाहता त्यांना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 302 प्रमाणे नगरसेवक हे लोकसेवक म्हणून घोषित केल्याने लोकसेवक अधिनियमाखाली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच यासंदर्भात चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. विशाल जाधव यांनी हजेरी मशीनची तोडफोड केली असल्याने त्यांच्याकडून नगरपालिका अधिनियम 1965 चे कलम 298 प्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोरे यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त पुणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातारा शहर यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget