Breaking News

वाठार येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश


वाठार स्टेशन (प्रतिनिधी) : वाठार स्टेशन हे गाव बर्‍याच वर्षापासून दुष्काळी गाव म्हणून प्रसिध्द आहे. या गावाला पूर्वी बोडके वाठार म्हणून संबोधत होते परंतु या गावचा पाणी प्रश्न अजूनही जैसे थेच आहे. तसेच वाठार स्टेशनला अनेक रथी-महारथी येऊन गेले कोणीही पाण्याचा प्रश्न मिटवू शकला नाही.

या सर्व बाजूंना बगल देऊन वाठार स्टेशनचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चंद्रकांत दादा पाटील (महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य), बबनराव लोणीकर, (पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य) तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अथक प्रयत्नातून वाठार स्टेशनसाठी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर केली. या पेयजल योजनेसाठी जिल्हा सरचिटणीस मनोज कलापट यांनी खूप पराकाष्टा केली त्यामुळे वाठार स्टेशन चा बोडके वाठार म्हणून असणारा कलंक कायमस्वरूपी भाजपाच्या माध्यमातून पुसला जाणार आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा वाठार स्टेशनचा पाणीप्रश्न मार्गी लावल्यामुळे वाठार स्टेशन विकास सेवा सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी, हिंदू एकता आंदोलनचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व्यापारी वर्ग यांनी शेकडो कार्यकर्त्यासह मोठ्या जल्लोषात भाजपात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. तसेच यापुढेही वाठार स्टेशनच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायमस्वरूपी बांधील आहोत असे आवाहन चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. भाजपात आलेल्या सर्व आजी-माजी पदाधिकार्‍यांचे सत्कार केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.