शिक्षणप्रेमी मिठ्ठू त्रिंबक आंधळे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना दिपावली अभ्यासिका भेट


तलवाडा (प्रतिनिधी):-प्रतिनिधी नियमितपणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन उपक्रम राबविणारे,विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण व्हावी,ग्रामीण भागातील विद्यार्थी हा स्पर्धेत मोठ्या उत्साहात सहभागी झाला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सतत वाव देणारे शिक्षणप्रेमी,सामाजिक कार्यकर्ते तथा जि.प.प्रा.शाळा रामनगर केंद्र तलवाडा ता.गेवराई येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मिठ्ठू त्रिंबकराव आंधळे यांनी आज आपल्या शाळेत एका नवीन उपक्रमाची सुरुवात केली.

यावेळी त्यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना दिपावली अभ्यासिका या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.या अभ्यासिकेने विद्यार्थ्यांना एक नविन दिशा मिळणार आहे.या अभ्यासिका जि.प.प्रा.शाळा थोरातवाडी ता.दौंड जि.पुणे येथील प्रा.शिक्षक श्री.संदिप मारूती शिरसाट यांनी तयार केलेल्या आहेत.शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा पेन,पुस्तक देऊन वाढदिवस साजरा करणे,विद्यार्थ्यांना वाचणाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी नुकतेच शाळेत ग्रंथालयाची स्थापना केली आहे. तसेच अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget