Breaking News

कर्जतच्या शिष्टमंडळाकडून शरद पवार यांची भेट


कुळधरण/प्रतिनिधी
कर्जत येथील शिष्टमंडळाने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश तोरडमल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांचे समवेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

यावेळी दुष्काळी परिस्थिती, कर्जमाफी, वैद्यकीय क्षेत्रातील समस्या आदी मुद्दे मांडत डॉ.राजेश तोरडमल यांनी पवार यांचे समवेत चर्चा केली. पाणी तसेच चार्‍याच्या टंचाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व्यथित झाले आहेत. शासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. याबाबत शिष्टमंडळाने चर्चा केली. कृषीबरोबरच वैद्यकीय क्षेत्रामधील समस्यांवरही यावेळी चर्चा झाली. या चर्चेत डॉ. सुभाष सूर्यवंशी, बबन म्हस्के, आबा डमरे, निखिल गायकवाड आदी सहभागी झाले. विविध सामाजिक प्रश्‍नांबरोबरच राजकीय विषयावरही पवार यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.