Breaking News

मी राजकारण सत्तेसाठी नाही तर समाजसेवेसाठी करतो-आ.देशमुख


माजलगाव,(प्रतिनिधी): मी आयुष्यातील प्रचंड गरिबी पहिली आयुष्यातील दोन वेळच्या भाकरी साठी मी हाताला फोड येईपर्यंत शेतात राबलो माझे वडील मी ६ महिन्याचा असताना वारले मी जी परिस्थिती ४० वर्षांपूर्वी पाहिली ती परिस्थिती आज लाखो मराठा कुटुंबियांवर आहे सरकारला मराठा आरक्षण द्यावेच लागणार आहे त्या साठी मी बलिदान देण्यास सज्ज असून माझे राजकारण सत्ते साठी नसून समाजसेवे साठी आहे असे प्रतिपादन आ देशमुख यांनी शिवप्रहार संघटनेच्या मराठा आरक्षण जनसंवाद कार्यक्रमाप्रसंगी केले या वेळी संजीव भोर पाटील यांनी उपस्थितां समोर दीड तास मार्गदर्शन केले तसेच मराठा समाजातील तरुणांच्या प्रश्नाला अभ्यासपूर्ण उत्तरेही दिली.

शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात शिवप्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेभाऊ शेजुळ व त्यांच्या सहकार्‍यांनी मराठा आरक्षण जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ आर टी देशमुख होते तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील,होते माजी सभापती भाजपाचे नितीन नाईकनवरे, अच्युत लाटे, बबनराव सिरसाट, पुरूषोत्तम जाधव, रमेश सोळंके, राजेंद्र होके, हनुमान कदम यांची प्रमुख उपस्थिती होती या वेळी बोलताना आ आर टी देशमुख यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची परिपूर्ती करण्यासाठी मी कोणतेही बलिदान देण्यास सज्ज असून मी परिस्थितिचे चटके सहन करीत इथपर्यंत आलो असून मला सध्या मराठा समाज कुठल्या परिस्थितून जात आहे.
याची कल्पना आहे भविष्यात मराठा समाजासाठी जिथे कमी तिथे आम्ही या धोरणानुसार कार्य करणार असून माझे राजकारण सत्ते साठी नसून समाजकारणा साठी असल्याचे त्यांनी सांगितले या वेळी मार्गदर्शन करताना संजीव भोर पाटील यांनी आरक्षण, अँट्रासिटी, या विषयावर अभासपूर्ण मार्गदर्शन केले भाजप सरकारने मराठा समाजासाठी मागच्या सरकारच्या तुलनेत काही निर्णय घेतले परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही १९ नोव्हेंबर नंतर जर आरक्षणाच्या बाबतीत योग्य निर्णय न झाल्यास भाजपा सरकारला याचा फटका बसेल सरकारने शब्दच्छल न करता लवकर आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घ्यावा अन्यथा मराठा समाजाच्या असंतोषाचा त्यांना सामना करावा लागेल इतराप्रमाणे आम्हाला जातीवरती मतदान करण्यास भाग पाडू नका अन्यथा सरकारच काय व्यवस्था उलटून टाकण्याची ताकद मराठा स्वतःच्या मनगटात ठेवतो,अँट्रासिटी काही जातीयवादी लोकांसाठी रोजगार हमी योजना झाली आहे त्यातही बदल करण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी स्पष्ट केल.
े या वेळी मराठा समाजातील काही तरुणांनी भीमा कोरेगाव, आरक्षण,अँट्रासिटी बद्दल प्रश्न विचारले असता काही परिवर्तनवादी, पुरोगामी संघटनेच्या दुटप्पी धोरणावर शेलक्या शब्दात टीका करून मराठा तरुणांनी कुठल्याही धर्मवादी, पुरोगामित्वाचा टेंभा मिळविणार्‍या संघटनेत सहभागी न होता स्वतःचे शिक्षण, उदयोग, शेतीत पूर्ण वेळ द्यावा भविष्याची पाऊले ओळखून स्वतःच्या कुटुंबाकडे व मुलाबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष दयावे असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.