रहिमतपुरात मटका अड्ड्यावर तीन लाख रुपयांची रोकड जप्त


कोरेगाव (प्रतिनिधी) : गांधीनगर, रहिमतपूर येथे कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी मटका अड्ड्यावर छापा टाकून 12 जणांना ताब्यात घेतले. या अड्ड्यावर सुमारे तीन लाखांची रोकड सापडली असून, एकूण सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

गांधीनगर येथे मटका अड्डा सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी कारवाईचा प्लॅन आखला. रहिमतपूरचे फौजदार गणेश जगदाळे, हवालदार राजेंद्र जाधव, पो. नि. संतोष नाळे, पो. कॉ. सागर पाटील, महेश पवार, सतीश कर्पे, सागर भुजबळ आदी पोलीस जवानांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पोलिसांना 2 लाख 93 हजार 774 हजाराची रोकड आढळून आली. मटका साहित्यासह 3 लाख 23 हजार 274 रुपयांचा ऐवज जप्त केला. यावेळी अफसर मुल्ला, रफीक मुल्ला यासह अनिल जॉन्सन, प्रकाश घोलप, सुधाकर बेलापूरकर, संतोष माने, किसन पिसे, नारायण थोरात, चंदू व पिंटू (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर कारवाई केली. तपास सपोनि घनशाम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. संतोष नाळे करत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget