डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून वडगाव हवेलीसाठी सव्वातीन कोटी


कराड (प्रतिनिधी) : वडगाव हवेलीसाठी गेल्या वर्षभरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून 4 कोटींचा विकासनिधी आणल्याचा जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप यांचा दावा फसवा आहे. वास्तविक गावाच्या पाणी योजनेसाठी ना. डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून 3 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीची तरतूद झाली. शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी 5 आरओ वॉटर एटीएम मंजूर झाल्याची माहिती वडगाव हवेलीचे उपसरपंच राजेंद्र थोरात यांनी दिली. 

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की गेल्या वर्षी वडगाव हवेली ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. यानंतर माझ्यासह काही नवनिर्वाचित सदस्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांची भेट घेतली असता, त्यांनी भाजपच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

त्यांच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत वडगाव हवेली गावाचा समावेश झाला असून, या माध्यमातून साकारण्यात येणार्‍या पाणी योजनेसाठी सुमारे 3 कोटी 30 लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच याबाबतच्या निविदा प्रक्रिया व अन्य सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या पाणी योजनांच्या कामाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे गावाला लवकरच पिण्याचे शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. उपसरपंच थोरात यांनी वडगाव हवेलीतील अन्य विकासकामाबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगून, जगताप यांनी एकांगी दावे करून विकासकामांचे श्रेय लाटण्याचे काम करू नये, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget