Breaking News

मुख्याधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर वाईतील बंद मागे; अतिक्रमण विरोधी मोहीम कायम चालू ठेवण्यावर मुख्याधिकारी ठाम


वाई (प्रतिनिधी) : अतिक्रमण विरोधी भाजी विक्रेत्यांनी बेमुदत पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी झाला असून बुधवारी वाईतील सर्व भाजी विक्रेत्यांनी सकाळपासून आपले सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. परंतू पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ, नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, व भाजी विक्रेत्यांचे मुख्य पदाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर पुकारलेला बंद मागे घेण्यात येवून मुख्याधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भाजी मंडई पुन्हा पुरवत सुरु करण्यात आली. 

व्यवसायिकांच्या मागण्या मान्य झाल्याने फटाके वाजवून त्यांनी आनंद व्यक्त केला. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मुख्याधिकारी यांनी मंडईची व्यवस्था योग्य पद्धतीने लावण्याचे आश्वासन देवून भाजी विक्रेत्यांच्या मागण्या मान्य केल्याने पुकारलेला बंद मागेघेण्यात आला. त्यामुळे वाईकर नागरिकांची होणारी गैरसोय दूर होवून नागरिकांमधून समाधान व्यक्त कारण्यात आले.

बुधवारी सकाळी दहा वाजता अतिक्रमण मोहीम सुरु करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी जाहीर केले होते. परंतु वाईतील भाजी विक्रेत्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येवून मंडईत ठिय्या मांडून बसले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाने यांनी एक दिवसांसाठी मोहीम थांबविण्यात आली. तर अतिक्रमण फक्त भाजी मंडईतच का? असा प्रश्न उपस्थित करून गरिबांवर होणारा अन्याय दूर करा! आम्हा व्यवसायिकांची बसण्याची व्यवस्था कायमची करा..! पण दर चार महिन्यांनी होणारी अतिक्रमण मोहीम थांबवा अशी मागणी करणारे निवेदन नगराध्यक्ष यांना आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष अशोकराव गायकवाड व भाजी व फळ विक्रेते संघटनेचे अध्यक्ष- युसुफ बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.व पालिकेच्या दालनात ठिय्या मांडून बसले. मुख्याधिकार्यांनी अतिक्रमणची व्याख्या समजावून सांगावी. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत भाजी मंडई बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याची भूमिका घेतली. मुख्याधिकारी सौ. पोळ यांच्याशी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व भाजी विक्रेत्यांचे प्रतिनिधी म्हणून अशोकराव गायकवाड, युसुफ बागवान, संतोष जमदाडे यांच्यात झालेल्या बैठकीत भाजी विक्रेत्यांना सर्व सोयीनी युक्त असे बसण्याची ठिकाण तयार करून देण्याचे ठरविण्यात आल्याने भाजी विक्रेत्यांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला. 

अन्यथा रस्त्यावर उतरणार 


प्रशासनाने भाजी मंडई मध्ये भाजी विक्रेत्यांना बसण्याची जागा आखून द्यावी त्यांना उन पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी शेड बाधून द्यावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुशोभिकरण, याबरोबर नगरपालिकेचे भाड्याने दिलेल्या गाळ्यांची नऊवर्षांची मुदत संपून 18 महिने झाले आहेत. त्याची निलाव प्रक्रिया सुरु करून पालिकेचे होणारे नुकसान थांबवावे, अन्यथा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.