तालखेड येथे माकपचा दुष्काळ व राशन प्रश्‍नावर मोर्चा


माजलगाव (प्रतिनिधी)- माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप)च्या वतीने तलाठी कार्यालयावर जबरदस्त मोर्चा काढण्यात आला यावेळी शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रू दुष्काळ आनुदान द्या, मागेल त्याला २ रू प्रतीकिलो राशन द्या, संजय गांधीनिराधार योजनेतील लाभार्थी यांना तात्काळ पगार द्या, जनावरांच्या दावणीला चारा व पाण्याची व्यवस्था करा, विद्यार्थी चे शैक्षणिक शुल्क व परिक्षा फिस माफ करा, तालखेड शिवारात रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ चालू करा, बोंड अळीचे अनुदान वाटप करा यावेळी या मागण्या चे निवेदन शासनाच्या वतीने मंडळ अधिकारी साहेब यांना देण्यात आले यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालखेड शाखा सचिव कॉ.आशोक राठोड, तालुका कमिटी सदस्य कॉ.विनायक चव्हाण कॉ.भिमराव जाधव, कॉ.विजय राठोड, ग्रा पं सदस्य बीबाबाई जाधव, दयानंद जाधव, कॉ.संजय चव्हाण, माजी ग्रा पं सदस्य माणिक जाधव, अविनाश डुबे, भास्कर खांडे, रेवन यादव, छबु राठोड, विनायक राठोड, ग्रा पं सदस्य राजाभाऊ जाधव, बापुराव घेणे, महादेव सुरवसे, आत्माराम गिरी, भिमराव राठोड, गिनानदेव राठोड, शिवाजी मुठाळ, बाबासाहेब गवळी,लखन राठोड, शिवाजी जाधव, दत्ता शेळके, मोहन राठोड, यांसह मोठ्या संख्येने शेतकरी महीला सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget