दहिफळमध्ये १२० रुग्णांची तपासणी, रक्तदान

परळी, (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी स्व.शामराव गदळे यांनी केजच्या डोंगरपट्ट्यात उभारलेल्या शिक्षण संस्थेमुळे दुर्गम भागात शैक्षणिक क्रांती घडून आली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असतांना त्यांनी आपल्या मुलांना घडवले. त्यांचा विचार दिला. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच त्यांची तीनही मुलं समाजासाठी कार्य करत आहेत. दादांनी उभारलेले काम आणि त्यांनी दिलेले विचार हे आजच्या तरुणांसाठी दीपस्तंभाप्रमाणेच आहे आणि हा दीपस्तंभ चिरकाळ टिकणारा असल्याचे प्रतिपादन केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी केले. शामराव गदळे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. शिक्षण महर्षी स्व.शामराव गदळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ दहिफळ (वडमाऊली) येथे अनेक कार्यक्रम संपन्न झाले. मान्यवरांच्या उपस्थितीत एक नोव्हेंबर रोजी १२०० रूग्णांच्या विविध आजारांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर दहिफळ सारख्या ग्रामीण आणि अतिशय दुर्गम भागात ३० जणांनी रक्तदान केले. आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. केज तालुक्यातील दहिफळ सारख्या डोंगरपट्यातील भागांत स्व.शामराव गदळे यांनी शैक्षणीक संस्था उभारून क्रांती घडवून आणली व यामुळे या भागांतील मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. शाम विद्यालयात शिक्षण घेतलेली अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवत असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमानिमित्त शाम विद्यालयाच्या प्रांगणात महिला-पुरूषांची मोठी उपस्थिती होती. केज तालुक्यातील मौजे दहिफळ वडमाऊली येथे शिक्षणमहर्षी स्व.शामराव गदळे यांच्या तृतीय स्मृतीदिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरूवातील लोकनेते गोपीनाथ मुंडे व स्व.शामराव गदळे यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. सकाळी आठ वाजता नामांकीत डॉक्टरांच्या पथकाने रूग्णांच्या आरोग्य तपासणीला सुरूवात केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget