सीसीटीव्ही पुटेजने लागला हरविलेल्या चिमुरडीचा शोध


ठाणे : प्रतिनिधी
कळव्यातील घोलाईनगर येथे राहणाऱ्या पूजा संतोष सांगवेकर ह्या महिलेने आपली सात वर्षाची बहीण वैष्णवी संतोष सांगवेकर ही चिमुकली गुरुवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घरातून हरवल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. अचानक चिमुरडी हरविल्याने पोलिसांनी गंभीरतेने आणि तत्परतेनं टॉप्स करून अखेर चिमुरडीला तिच्या पालकाच्या स्वाधीन केले.


या प्रकरणी कळवा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत चिमुकलीचा शोध सुरु केला होता. त्यासाठी कळवा पोलिसांनी 4 पथक नियुक्त करून मुलीचा परिसरात व रेल्वे स्थानकावर कसून शोध सुरु केला होता. ही मुलगी नियमितपणे वावरत असलेल्या ठिकाणी तपास करण्यात आला तसेच आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करण्यात आली. चिमुकली राहात असलेल्या ठिकाणापासून ते कळवा रेल्वे स्टेशन पर्यंत व आजूबाजूच्या परिसरातील 20 ते 22 सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी तपासून पहिले. या पैकीच एका सीसीटीव्हीत हरवलेली मुलगी कळवा स्थानकातून कुर्लाकडे जाणाऱ्या लोकल मध्ये चढली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही मुलगी कुर्ला रेल्वे स्टेशन इथे असल्याचे समजले. मिळालेल्या माहिती नुसार त्वरित पोलीस पथक कुर्ला स्टेशन येथे पाठवण्यात आले. तेथील लोकांनी पोलिसांना सांगीतले सदर मुलगी खूप रडत असल्यामुळे तिला रेल्वे पोलिसांच्या मदतीने मानखुर्द बालसुधारगृहा मध्ये दाखल केले आहे. पोलीसांनी सुधारगृहात जाऊन मुलीला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने सांगीतले ती बहिणीकडे राहते, तिला नवीन कपडे हवे होते म्हणुन ती स्वतःच आईकडे कपडे घेण्यासाठी म्हणुन घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती कळवा स्थानक व तेथून कुर्ला स्थानकावर पोहचली. दरम्यान कळवा पोलिसांनी चिमुकलीचा कसून शोध घेत तिला अवघ्या 12 तासाच्या आता शोधून काढले व तिला पालकांकडे सुखरूप सुपूर्द केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget