खामगाव नगरपरिषद बनली बेकायदेशीर ठराव घेण्याचा अड्डा -न.प.काँग्रेस पक्षनेत्या अर्चनाताई टाले यांचा आरोप


खामगाव,(प्रतिनिधी): देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी फार मोठे योगदान दिले असे जागतिक किर्तीचे महाकवी, थोर समाज सुधारक रविंद्रनाथ टागौर ज्यांनी हम होंगे कामयाब एक दिन, वंदे मातरम् व भारताचे राष्ट्रगीत जन गण मन यासारख्या अनेक देशभक्तीपर गीतांची रचना केली त्या महापुरुषाचे नगर परिषद सभागृहाला असलेले नांव बदलून फुंडकरांचे नांव देणे, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नावाने सुरु असलेली न.प.प्राथमिक शाळा क्र.12 च्या सोयी सुविधांकडे सत्ताधारी भाजपाने दुर्लक्ष केल्यामुळे बंद शाळेचे अभिलेखे व इतर साहित्य दुसरीकडे हस्तांतरण करण्याची ओढवलेली नामुष्की, प्रधानमंत्री आवास योजनेत गोरगरीबांची नांवे समाविष्ट न करता भ्रष्टाचार करण्याचे उद्देशाने निकषात न बसणारेंना घरकुलाचा लाभ देण्यासाठी घेतलेले ठराव इत्यादी महत्वाचे ठराव सत्ताधारी भाजपाने चर्चा न करता बहूमताच्या जोरावर पारीत बेकायदेशिररित्या ठराव पारीत केले.

 सत्ताधारी भाजपाच्या या नियमबाह्य कृतीचा काँग्रेस नगरसेवकांनी निषेध केला असून खामगांव नगर परिषद ही बेकादेशिर ठराव घेण्याचा अड्डा बनली आहे, असा आरोप न. प. काँग्रेस पक्षनेत्या अर्चनाताई टाले यांनी केला आहे. 3 नोव्हेंबर रोजी नगर पालिकेची सर्व साधारण सभा पार पडली. या सभेत मागील वर्षापासून झालेल्या 4 सर्व साधारण सभांचे कार्यवृत्त मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. शासन नियमानुसार 7 दिवसांचे आंत ठराव अंतीम करुन प्रकाशित करणे व वेबसाईटवर अपलोड करणे अनिवार्य आहे असे असतांना या 4 सभांचे कोणतेही कागदपत्रे सभेसमोर मंजुरीसाठी न ठेवता व चर्चा ना करता बेकायदेशिररित्या कार्यवृत्त मंजूर करण्यात आले. या सभेत विषय क्र. 19 वर खामगांव नगर पालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये असलेल्या सभागृहाला रविंद्रनाथ टागौर यांचे नांव होते काँग्रेसच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या नविन प्रशासकीय इमारतीमधील सभागृहाला देखील रविंद्रनाथ टागौर यांचे नांव कायम ठेवणे अपेक्षित होते मात्र जागतिक किर्तीचे महाकवी असलेल्या रविंद्रनाथ टागौराच्या कार्याचे विस्मरण झाले की काय म्हणून त्यांचे नावाऐवजी फुंडकरांचे नांव देण्याचा घाट सत्ताधाछयांनी घातला. नगर परिषदेची प्रशासकीय इमारत काँग्रेस सरकारच्या कालावधीत बांधण्यात आली असुन काँग्रेस शासनाने नगर परिषद इमारतीला व सभागृहाच्या अंतर्गत सजावटीला निधी उपलब्ध करुन दिला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक प्रविण कदम यांनी भाजपाने निधी आणुन एखादे नविन सभागृह बांधावे व त्याला फुंडकरांचे नांव द्यावे आमची काही हरकत नाही. रविंद्रनाथ टागौर यांच्या कार्यापेक्षा भाऊसाहेब मोठे नाही असे सांगीतले. परंतू सत्ताधारी काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते तरी बहुमताच्या जोरावर बेकायदेशीर ठराव मंजूर करून रवींद्रनाथ टागोर सारख्या महान नेत्याचा अपमान केला असा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला. विषय क्र. 26 वर महात्मा ज्योतीबा फुले न. प. मराठी शाळा क्र. 12 मधील शालेय अभिलेखे इतर साहित्यसह न. प. मराठी शाळा क्र. 9 मध्ये हस्तांतरण करणे हा विषय बहूमताच्या जोरावर पारीत करण्यात आला. वास्तविक पाहता न. प. मध्ये काँग्रेसची सत्ता असतांना शहरातील नगर परिषद शाळांची व्यवस्था अत्यंत चांगली होती. विद्यार्थ्यांना ई-लर्निंग सुविधा, शाळेची रंगरंगोटी, चांगले शिक्षण यासारख्या सुविधा मिळाल्यामुळे न. प. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाली होती. परंतु सध्याच्या भाजपा सत्ताधारी यांनी न. प. शाळेच्या सोई सुविधेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नगर परिषद शाळांची दयनीय अवस्था झाली असुन काही न. प. शाळा बंद झाल्या आहेत विषय क्र. 29 वर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पी.एम.सी. कडून प्राप्त झालेले डीपीआर प्रकल्प अहवाल शासनाकडे मंजुरातीकरीता सादर करण्यासाठी मंजुरी घेण्याचा ठराव कोणतीही चर्चा न करता बहूमताच्या जोरावर मंजुर करण्यात आला. घरकुल योजनेत गोर गरीब लाभार्थ्यांची नांवे समाविष्ट न करता अनेक धनदांडग्याची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. जे निकषात बसत नाही अश्या व्यक्तींचा सुध्दा भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अगोदर या योजनेच्या लाभाथ्र्यांची यादी व सर्व केस पेपर दाखविण्यात यावे अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी केली तरी देखील भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने हा ठराव मंजुर केला. अपक्ष नगर सेविकेच्या पतीला जागा द्यायची आहे म्हणुन मनमानी करुन बहूतमताच्या जोरावर बेकायदेशिर ठराव घेतल्याचा देखील आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेची सभा झाल्यानंतर जवळपास 12 महिन्याचा कालावधी पुर्ण होत आला तरी नगर परिषदेच्या कार्यवृत्त पुस्तिकेमध्ये ठरावाची नोंद घेण्यात आलेली नाही. कार्यवृत्त कायम करण्यापुर्वी नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशिर कामांना मान्यता दिली आहे. सभेपुर्वी काँग्रेस नगरसेवकांनी केसपेपर पाहण्यासाठी मागीतले असता मिटींग संबंधी माहिती काँग्रेस नगरसेवकांना देऊ नका असे वैभव डावरे यांनी सभा लिपीकाला फोन करुन सांगीतले व सर्व कागदपत्रे अध्यक्षा न. प. कार्यालयात हजर नसतांना त्यांच्या चेंबरमध्ये घेऊन गेले. सभेतील विषयाच्या टिपण्या वेळेवर देण्यात येत नाही. ज्या काही टिपण्या देण्यात येतात त्यावर ती कोणत्या विषयाची आहे, त्याचे नाव, दिनांक न टाकता अर्धवट स्वरुपाची टिपण्या पुरविण्यात येते. शासनाचे परिपत्रकानुसार कोणत्याही सदस्याच्या पती व मुलाला कामकाजात हस्तक्षेप करता येत नाही. मात्र नगराध्यक्षा सौ. डवरे यांचे पती वैभव डवरे हे न. प. च्या कार्यालयीन कामकाजात ढवळाढवळ करीत आहेत. एकंदरीत खामगांव नगर परिषद भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर ठराव घेण्याचा अड्डा बनली आहे. नगराध्यक्षा अनिता डवरे ह्या नामधारी असून त्यांचे पती वैभव डवरे कारभारी झाले आहेत एवढे मात्र खरे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget