Breaking News

संगमनेरची विकासकामांतून वैभवशाली शहराकडे वाटचाल : आ.थोरात


संगमनेर/प्रतिनिधी 
संगमनेरच्या सांस्कृतिक व सुरक्षित वातावरणामुळे शहराची झपाट्याने वाढ होत आहे. शहरात पाण्याची मुबलक सुविधेसह सातत्याने राबविलेल्या विकासाच्या योजनांमुळे शहरात प्रगतीशील ठरले आहे. नगरपालिकेने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेवून गुणवत्ता सिध्द केली असून संगमनेर हे स्वच्छ, गार्डन व वैभवशाली शहर होत असल्याचे गौरवोद्गार मा.महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. 


संगमनेर शहरातील प्रभाग क्र. 1 ते 14 मधील प्रभागांत रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, क्रॉक्रेटीकरण तसेच बंदिस्त भूमीगत गटारे यांसह नव्याने विकसीत करण्यात आलेले नेहरु गार्डनचे लोकार्पण आदी कामांचे भूमीपूजन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे सत्यजीत तांबे, इंद्रजित थोरात, सभापती निशाताई कोकणे, शिवाजीराव थोरात, नवनाथ अरगडे, मनिष मालपाणी, बााळासाहेब पवार, दिलीपराव पुंड, विश्‍वासराव मुर्तडक, सुमित्रा दिड्डी, रुपाली औटी, सचिन बांगर, सोनाली शिंदे, नुरमहंमद शेख, कुंदन लहामगे, सुहासिनी गुंजाळ, बेपारी शबाना, सुनंदा दिघे, शमा अहमद शेख, आरीफ देशमुख, किशोर पवार, गजेंद्र अभंग, मनिषा भळगट, प्रियंका भरीतकर, नितीन अभंग, मालती डाके, लखन घोरपडे, मेघा भगत, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री योगिता पवार, दानिश खान, वृषाली भडांगे, वसिम शेख, नसिमबानो पठाण,योगेश जाजू,हिरालाल पगडाल,रिजवान शेख आदि मान्यवर उपस्थित होते. यामध्ये नविनगर रोड, सुवर्ण पथ रंगार गल्ली, सय्यद बाबा चौक, रस्त्याचे ट्रिमिक्स रस्त्याचे कॉक्रेटीकरण तसेच जनतानगर, इंदिरानगर, गणेशनगर या भागांतील रस्ते व गटारीचे कामे, वि.दा.सावरकर मंगल कार्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या अभ्यासिका तसेच नेहरु गार्डन येथे नुतनीकरण व मत्सालयाचे लोकार्पण सोहळा, पंपीग स्टेशन येथील मुरलीधर किसनराव डोंगरे जलशुध्दीकरण केंद्र यांचा लोकार्पण सोहळा ही यावेळी करण्यात आला. यावेळी आ. थोरात म्हणाले कि, 1991 ला आ. डॉ.सुधीर तांबे यांनी नगराध्यक्षपद स्विकारले आणि शहराच्या विकासाची घडी बसविली. त्यानंतर झालेले सगळे नगराध्यक्ष व त्यांचे नगरसेवक यांनी चांगले काम केले. दुर्गाताई तांबे यांनी स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर व गार्डन संगमनेरची संकल्पना घेवून खुप चांगले काम केले आहे. वेगवेगळा निधी मिळवून शहरात मोठ मोठी विकासकामे आपण मार्गी लावली. निळवंडे थेट पाईप लाईन, बायपास, भूमिगत गटारी, विविध रस्ते यांसह शहरात 28 गार्डनची निर्मिती झाली आहे. संगमनेर हे व्यापारी, सहकार व शैक्षणिक दृष्ट्या मोठे केंद्र झाले असून शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही नगरपालिकेने नागरिकांना चांगल्या सुविधा देत कौतुकास्पद काम केले आहे. विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेवून यश मिळविले आहे. भाजपा सरकारने गुणवत्तेने व खरे काम केलेल्यांना बक्षिस दिले नाही. स्व.विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात संगमनेर शहरासाठी त्यांनी प्राधान्याने मदत केली. दुष्काळी भागासाठी आपण निळवंडे धरण केले आहे. संगमनेर पाईप लाईन योजनेमुळे शहरात नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहे. शहरात सर्वत्र दुष्काळ असतांना सर्व नागरिकांनी हे पाणी काटसरीने वापरावे व स्वच्छ संगमनेर व हरित संगमनेर या संकल्पनेत प्रत्येकाने सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सचिन बांगर यांनी केले. सुत्रसंचालन निलेश पर्बत यांनी केले तर आभार बाळासाहेब पवार यांनी मानले. 

शहरात 28 गार्डनची निर्मिती 
हरित शहर संकल्पनेतून शहरात 28 गार्डनची निर्मिती केली असून सर्व रस्त्यांच्या दुतर्फा मोकळया जागेत वृक्षारोपण केले आहे. हरित व स्वच्छ संगमनेरचे हे वैशिष्ट्रे ठरले आहे.