आरेगांव येथे गोवर-रुबेला लसीकरण संपन्नडोणगाव,(प्रतिनिधी) आरेगांव येथे आरोग्य विभागाच्या वतिने गोवर रुबेला लसिकरण यशस्वी पार पडले. यासाठी दोन बुथचे नियोजन करण्यात आले होते. सदर लसिकरणाचे शुभांरभ आरेगांव येथिल सरपंच श्रीमती वायाळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानीचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ.ज्ञानेश्‍वर टाले हे होते. सरपंच व डॉ.ज्ञानेश्‍वर टाले यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपामध्ये लसिकरण केलेल्या विध्यार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.

एखाद्या चांगल्या मोहीमेची शुभारंभ होण्याअगोदर आपल्याकडे अफवा पसरविली जाते. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून हया लस बद्दल तुमच्या आजूबाजूला असणार्‍या पालकांच्या मनात काही गैरसमज असतील तर त्यांची समजूत घालून त्यांना लस देऊन बालकांना सुरक्षित करण्यास आवाहन डॉ. टाले यांनी केले. गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते असे यावेळी सांगण्यात आले. सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपसरपंच,सदस्य,शिक्षकवृंद,आरोग्य सेवक, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनिस, आशा वर्कर्ससह गजानन वायाळ, रामकिसन वायाळ,कार्तिक घाटोळकर,तुकाराम सदावर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget