जेष्ठ कलावंत गणपतराव गोंधळी लोककलावंत पुरस्काराने सन्मानित


नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील नजिकचिंचोली येथील जेष्ठ गोंधळ जागरण कलावंत गणपतराव शेकूजी गोंधळी यांना श्रीरामपूर येथे झालेल्या कार्यक्रमात लोककलावंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्रीरामपूर येथील नगर परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रीय वाहन चालक युनियन व लोकरंगचे करियर कॉम्पुटर श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य दिवाळी पुस्तक प्रकाशन सोहळ्यासह काव्य संमेलनाच्या झालेल्या कार्यक्रमात डॉ.अशोक शिंदे काव्य संमेलनाध्यक्ष डॉ.दादासाहेब गलांडे यांच्या हस्ते व चालक आंदोलन दिवाळी विशेषांकचे संपादक रफिकभैय्या शेख, मौलिक रत्न पुस्तक प्रकाशचे लेखक मिराबक्ष शेख, रफिक शेखसर, शब्दगंध साहित्य परिषदेचे राजेंद्र फंड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार गणपतराव गोंधळी यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी लोककलावंत पुरस्कार विजेते गणपतराव गोंधळी यांचे समवेत त्यांचे सुपुत्र टीव्ही स्टार गोधळ लोककलावंत दिगंबर गोंधळी, भाऊसाहेब गोंधळी, बालकलाकार श्रीनिवास गव्हाणे, समर्थ गोंधळी यांच्या सह संयोजन समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक दशकांपासून गणपतराव गोंधळी यांनी गोंधळ जागरण या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन व जनजागृतीचे मोठे काम केल्याने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना लोककलावंत हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget