नोंदी करून उतारा देण्यासाठी लाच घेणारा तलाठी ‘जाळ्यात’


सातारा (प्रतिनिधी) : पोल्ट्री फार्मचे बांधलेले शेड 7/12 उतार्‍यावर नोंद करुन दाखला देण्यासाठी 2 हजार रुपयाची लाच घेणारा अजिनाथ महादेव पालवे (वय 38, मूळ रा. मेहकरी, जि. अहमदनगर) हा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. 

तलाठ्याने 3 हजार रुपयांची लाच मागीतली. यानंतरच्या तडजोडीअंती 2 हजार रुपयांचा हा व्यवहार ठरला. ही 2 हजारांची लाच स्वीकारताना पाडळी (सातारारोड ता.कोरेगाव) येथील तलाठी अजिनाथ महादेव पालवे (वय 38, मूळ रा.मेहकरी जि.अहमदनगर) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या आईच्या नावावर शेतजमीन असून, त्यामध्ये पोल्ट्री फार्म बांधले आहे. त्या पोल्ट्री फार्मची 7/12 वर नोंद करण्यासाठी तक्रारदार हे पाडळी गावच्या गावचे तलाठी अजिनाथ पालवे याच्याकडे गेले. पोल्ट्री फार्मबाबत माहिती दिल्यानंतर संबंधित कामासाठी पालवे याने 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी सातारा येथील एसीबीकडे तक्रार दिली होती. 

तक्रार दाखल झाल्यानंतर त्याबाबत पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. यावेळी तक्रारदारांनी 3 हजार रुपयांऐवजी 2 हजार रुपये देणार असल्याचे सांगितल्यानंतर बुधवारी सकाळी लाचेची रक्कम घेण्याचे ठरले. ग्रामपंचायत कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबी विभागाने पालवे याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. या कारवाईनंतर तलाठी अजिनाथ पालवे याच्याविरुध्द कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीतर्फे केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget