वृध्दाश्रमातील वृध्दांना मिष्ठान्न भोजन देऊन वाढदिवस साजरा

 जामखेड ता./प्रतिनिधी
 तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते  संजय कोठारी  परिवाराने आपला नातु नमित चा दुसरा वाढदिवस वृध्दाश्रमातील वृध्दांना मिष्ठान्न भोजन देवुन  साजरा केला. नमित तेजस कोठारी यास दोन  वर्ष पूर्ण झाले आहे. त्याचा दुसरा वाढदिवस थाटामाटात न करता नळीवडगाव  येथील ह.  भ.प.गहीनीनाथ लोखंडे महाराज  हे चालवत असलेले वृध्दाश्रमातील  वृध्दांना  मिष्ठांन्न  भोजन  दिले. यावेळी वृध्दाश्रमातील  वृध्दांच्या चेहर्‍या वरील   आनंद  पाहण्यासारखा  होता. ज्या लोकांना  त्यांचे मुले, नातेवाईक  सांभाळत नाही अशांना लोखंडे महाराज  खेडोपाडी भिक्षा मागुन आणतात आणी  त्यांची पोट भरतात महत्वाचे म्हणजे तेथे पाण्याची सोय नाही. पिण्याचे पाणी तीन किलो मिटर वरून आणावे लागते. अशा अडचणीत लोखंडे महाराज   या वृध्दांना संभाळतात. यावेळी ह.भ.प.गोपीनाथ नाना ऊगलमुगले म्हणाले मी बर्‍याच दिवसांपासुन संजुभाऊचे  सामाजिक  कार्य  पहात आहे. या  आश्रमात त्यांनी आत्तापर्यंत बर्‍याचदा मदत  केली आहे. मागीलवेळी स्वेटर, चादर आम्हाला  दिले बर्‍याचदा मिष्ठांन्न भोजनही दिले आहे. कोठारी  हे  नेहमी गोरगरीबांना  मदत  करतात त्यांना कधीच कमी पडणार नाही नमित ला आमच्या कडुन  हार्दिक  शुभेच्छा . तसेच  गहीनीनाथ लोखंडे महाराज   म्हणाले  संजुभाऊ  मुळे आम्हाला आता सर्व जण मदत  करतात त्यांचे मी आभारी आहे.  यावेळी अशोक  महामुनी  म्हणाले  नमित चा वाढ  दिवसाच्या  निमित्ताने  व दिवाळीच्या फराळाचे या वृध्दाश्रमातील वृध्दांना  मिष्ठांन्न  भोजन  दिले आम्हाला  फार फार आनंद वाटला या आश्रमातील   वृध्द  नेहमी संजय  कोठारीची  आतुरतेने  वाट  पहात  असतात. यावेळी कोठारी म्हणाले मला समाज सेवेत  खरा आनंद  मिळतो गोरगरीबांना  मदत   करुन  जो  आनंद  मिळतो  तो  कश्यातच मिळु  शकत नाही.  यावेळी   केकान,  तेजस  कोठारी, रोहन  कोठारी,   राकेचा,  चंचल  राकेचा,   स्वेता  कोठारी, पल्लवी रोहिदास,  केकान आदी  उपस्थित  होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget