कुडाळ येथील जुगार अड्डा उद्‌ध्वस्त


मेढा (प्रतिनिधी) : जावली तालुक्यात मटका, अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. कुडाळ येथील दीपक वारागडे याच्या मटका अड्ड्यावर पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे व त्यांच्या पथकाने छापा टाकून अडतीस हजार पाचशे रुपयांची रोकड व मटक्याचे साहित्य जप्त करून पाच जणांना अटक केली.

कुडाळ येथे दीपक वारागडे याचा मटका अड्डा जोमात सुरु असल्याची खबर उपनिरीक्षक संतोष चामे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस कर्मचारी गणेश सणस,लंकेश पराडके यांना घेऊन जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी महादेव दादू पवार, प्रमोद यशवंत पवार, प्रविण रामचंद्र वारागडे, सुनील गोविंद गावडे (सर्व रा. कुडाळ व संजय यशवंत पवार (रा. आलेवाडी) यांना अटक करून त्यांच्याकडील अडतीस हजार पाचशे चाळीस रुपये व मटक्याचे साहित्य जप्त केले .

दीपक वारागडे याच्या सांगण्यावरून हे पाचजण हा जुगार अड्डा चालवत होते. दरम्यान, दीपक वारागडे यांच्यावरील पंधरा दिवसातील ही दुसरी कारवाई आहे. या अगोदर त्याच्या अबोली धाब्यावर पोलिसांनी धाड टाकून अवैध दारू अड्डा उद्‌ध्वस्त केला होता. नागरिकांनी पोलिसांनी दारू, मटका अड्ड्यावरील केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. अजून इतर अड्डे बाकी आहेत त्यांचं काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget