Breaking News

लायन्स मिडटाऊनचे सामाजिक कार्य वंचितांसाठी आधार -महेश पाटील


अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अमदनगर मिडटाऊन शहरात गेल्या पंचवीस वर्ष विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. वंचित व गरजू घटकांसाठी क्लब हा आधार ठरला आहे. क्लबच्या रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्त विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात दिला जात असल्याची भावना लायन्सचे विभागीय अध्यक्ष महेश पाटील यांनी व्यक्त केली.

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनची सर्वसाधारण सभा हॉटेल फरहत येथे झाली यावेळी पाटील बोलत होते. याप्रसंगी क्लबच्या अध्यक्षा राजश्री मांढरे, सचिव छाया राजपूत, खजिनदार राजश्री शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात राजश्री मांढरे यांनी क्लबच्या रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्त राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. 

आंतराष्ट्रीय लायन्स क्लबकडून नगरच्या लिओ क्लबला सनद मिळाली असून, ही सनद लिओचे अध्यक्ष रणवीर शितोळे व सचिव शुभम भिसे यांना महेश पाटील व लायन्स मिडटाऊनचे संस्थापक श्रीकांत मांढरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. लायन्स मिडटाऊनने लिओ क्लब पुरस्कृत केल्याबद्दल श्रीकांत मांढरे व राजश्री मांढरे यांना आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेकडून मिळालेले प्रशस्तीपत्राने गौरविण्यात आले. आकाशवाणीच्या निवेदिका विणा दिघे व साधना कोठारी यांनी लायन्सचे सभासदत्व स्वीकारल्याबद्दल लायन्सची पीन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

बैठकीनंतर राजकुमार गुरुनानी यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम रंगला होता. यावेळी क्लबचे हरीश हरवाणी, मीना हरवाणी, शर्मिला पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत झंवर, अ‍ॅड.रवींद्र शितोळे, अरुण झंवर, डॉ.कल्पना ठुबे, अ‍ॅड. सुनंदा तांबे, लतिका पवार, अतुल काथेड, मनीषा काथेड, पी.एन. डफळ, दिगंबर कोंडा, मदन राजपूत, संजय लुणिया, संतोष माणकेश्‍वर, कुमार शेटे, ज्योती शेटे, प्राचार्या शोभा भालसिंग, हेमलाता बरमेचा आदी उपस्थित होते.