बँम्ब तोंडात फुटला, चिमुकल्याचा मृत्यू

बुलडाणा/प्रतिनिधी
सुतळी बॉम्ब तोंडात पकडून फुटल्याने एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली आहे. यश संजय गवते (पिंपळगाव सराई) असं मृत मुलाचं नाव आहे. मंगळवारी हा प्रकार घडला असून या घटनेने दिवाळीच्या तोंडावर फटाके उडविण्यार्‍यांना मोठी चपराख बसली आहे.


दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे यश त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर फटाके फोडत होता. खेळता खेळता यश घरात आला आणि काडीपेटीचा डब्बा घेऊन बाहेर गेला. त्यावेळी त्याचे वडील जेवत होते. अचानक काही वेळाने स्फाटाचा आवाज आला. त्याच्या वडिलांनी बाहेर जाऊन पाहिलं असता, यश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

खेळताना यशला सुतळी बॉम्ब सापडला. यशने तो बॉम्ब फोडण्यासाठी विस्तवासमोर ठेवला. पण बॉम्ब फुटलाच नाही. मग यशने सुतळी बॉम्ब पुन्हा हातात घेतला. सुतळी बॉम्बची वात तोंडात धरत असतानाच तो फुटल्याने यशला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं. परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget