Breaking News

दिवाळीपुर्वी कर्जमाफीची रक्कम द्यावी- मुंदडा

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- केज मतदार संघात सर्व शेतकरी बांधव हे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत,बोंडअळी,पावसाचे कमी प्रमाण यामुळे आज जीवन जगणे अवघड झालेले आहे तसेच या शासनाने ही परिस्थिती सावरण्यासाठी मागील वर्षी कर्जाची रक्कम ही माफ केली होती परंतु हा नुसता शासन आदेश काढला हातात मात्र काहीच आलेले नाही या दिवाळीपुर्वी सर्व शेतकरी बांधवाना कर्जाची रक्कम दिली जावी व त्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी केज मतदार संघ यांच्यावतीने दि. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी उपजिल्हा धिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले यावेळी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्यासहित असंख्य कार्यकर्तांची उपस्थिती होती.ल शासनाने थकबाकीदार शेतकर्यांना दिड लाखापर्यंत व रेग्युलर भरणा करणारया शेतकरयांना कर्जाच्या पंचेवीस टक्के किंवा पंधरा हजार रुपयापर्यंत २०१७पर्यंतच्या शेतकरयांना कर्ज माफ केल्याची घोषणा केली होती,या कर्जमाफी साठी शासनाने जवळपास ३० ते ३५वेळेस शासन निर्णय काढले आहेत,परंतु बीड जिल्ह्यात अद्यापही शेतकरयांच्या थकीत २०१७कर्ज प्रकरणात दिड लाखापर्यंत व रेग्युलर भरणा करणारयांना कर्जाच्या २५%किंवा १५हजार रुपये माफी अद्यापही शेतकरयांना मिळालेली नाही स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा केज (जुनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांच्याकडे २०१७ मधील कर्जदार संख्या ३१५६ आहे. कर्जमाफीत फक्त ११७८ शेतकर्यांनाच मिळाली आहे.