हंबर्डे महाविद्यालयाच्या रासेयोची आष्टी तहसील परिसरात स्वच्छता मोहीम


आष्टी,(प्रतिनिधी):आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनेे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, सचिव अतुल सेठ मेहेर प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे याच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तहसील कार्यालयात शंभर विद्यार्थी विद्यार्थीनि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

प्रथम नायब तहसीलदार पांडुळे साहेब आणि नायब तहसीलदार थेऊरकर मॅडम यांनी विद्यार्थांना यथोचित मार्गदर्शन केले. स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.आज देश अनेक असाध्य आजारांनी ग्रासला आहे. याला स्वच्छतेचा अभाव कारण आहे.आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थांनी स्वच्छतेला अधिक महत्व देऊन हे अभियान हाती घेतले आहे. ही स्तुत्य चळवळ आहे.नायब तहसीलदार थेऊरकर मॅडम म्हणाल्या की,आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण तहसीलला भेट देऊन स्वच्छतेचे अभियान राभवित आहात या बद्दल कौतुक करावेसे वाटते.अशीच चळवळ संपूर्ण तालुक्यात राबवावी अशी त्यांनी सूचना केली.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र वैरागे,प्रा.सय्यद अल्लाउद्दीन, प्रा.एन.डी.पालवे, प्रा.मनीषा देवगुडे,प्रा. आर.आर. कांबळे,आणि तहसीलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget