विश्‍वासघातकी, जुलमी,भ्रष्ट मोदी व फडणवीस सरकारच्या विरोधात जनसंपर्क अभियान -मोदी


अंबाजोगाई (प्रतिनिधी) जनतेला सन २०१४ साली लोकसभा निवडणुक प्रचारात दिलेल्या आश्‍वासनाला चुनावी जुमला संबोधणार्या मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रातील व फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्यातील भाजप सरकारने जनविरोधी व दिवाळखोर कारभार सुरु केला आहे.या मनमानी कारभाराचे फटके व गंभीर परिणाम देशातील व राज्यातील गोरगरिब जनतेला व मध्यम वर्गाला भोगावे लागत आहेत.देशातील लोकशाही,लोकांचे स्वातंत्र्य व भारताचे संविधान आज धोक्यात आले आहे. हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे विश्‍वासघातकी, जुलमी,भ्रष्ट मोदी व फडणवीस सरकारच्या विरोधात देशात अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनसंपर्क अभियानाची हाक दिली आहे.तर राज्यात प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी जनसंपर्क अभियान प्रभावीपणे राबविले उचलली जात आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेने जनविरोधी भाजप सरकार उलथवून टाकण्यासाठी जनसंपर्क अभियानात सामील व्हावे.आपल्या अधिकाराचे,आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करावे कॉंग्रेस पक्ष जनतेसोबत आहे.चला तर मग लोकशाही वाचवण्यासाठी सज्ज व्हा जनसंपर्क अभियानात सहभागी व्हा.असे आवाहन बीड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे वतीने जनसंपर्क अभियानाचा प्रारंभ अंबाजोगाई येथे गुरूवार,दि.१ नोव्हेंबर २०१८ रोजी जनसंघर्ष यात्रा व जाहिर सभेत करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे वतीने संपादित जनसंपर्क अभियान माहितीपुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे प्रभारी खा.मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा.अशोकरावजी चव्हाण,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री प्रा.सुरेश नवले,प्रा.सत्संग मुंडे, प्रा.टि.पी.मुंडे,माजी आ.सिराज देशमुख, माजी आमदार नारायणराव मुंडे,बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, मिनाक्षीताई पांडुळे, ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे,दादासाहेब मुंडे, अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी,केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील,प्रा.सर्जेराव काळे,अब्दुल हकीम, ऍड.विष्णुपंत सोळंके आदींसह पक्षाचे राज्य व जिल्हा पातळीवरील नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. *काय आहे कॉंग्रेसचे जनसंपर्क अभियान..!*
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे वतीने भ्रष्ट व जनविरोधी भाजप सरकार सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी जनसंपर्क अभियानाची हाक दिली आहे.देशात व राज्यात सत्तेवर आल्यापासून भाजप व शिवसेना यांच्या सरकारने पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचाराला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील पंधरा मंत्री भ्रष्टाचारात, गैरप्रकारात गुंतले असूनकोणतीही चौकशी व शहानिशा न करताच मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना क्लिन चिट दिली आहे.कर्जमाफी, दुष्काळप्रश्‍नी कागदी घोडे नाचविण्याचे व रोज नवनवे खोटे जिआर काढण्याचे काम सरकार करीत आहे. राज्यातील गोरगरिब जनता,शेतकरी, शेममजुर,विद्यार्थी, महिला,कामगार,छोटे मोठे व्यापारी हे भरडले जात आहेत.तेव्हा या सर्व समाजघटकांनी कॉंग्रेसचे जनसंपर्क अभियानात सामील व्हावे असे आवाहन कॉंग्रेस पक्षाचे वतीने करण्यात येत आहे. यासाठी पक्षाचे वतीने माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.या पुस्तिकेत कॉंग्रेस शासनाने १९४७ ते २०१४ पर्यंत (विरोधी पक्ष सत्तेत असलेली काही वर्षे वगळून) देशात केलेला विकास, प्रगतीची आकडेवारी तसेच राज्यात गेल्या ६० वर्षात राबविलेल्या क्रांतिकारी विकास योजना यांची माहिती दिली आहे.मोदी सरकारने जनतेचा केलेला घोर विश्‍वास व राज्यातील भाजप शिवसेना सरकारने राज्य दिवाळीखोरीत नेवून कर्जबाजारी केल्याबाबतची कॉंग्रेस व भाजप सरकारच्या काळातील विकास केल्याबाबतची तुलनात्मक माहिती यात नमुद केली आहे.अशी माहिती बीड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात, तालुक्यातील प्रत्येक शहर,गावा-गावातील प्रत्येक वाडी,वस्ती,तांडे, मोहल्ला व कॉलनीतील प्रत्येक घरात कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी, सर्व तालुकाअध्यक्ष,सर्व शहराध्यक्ष,युवक कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, सेवादल तसेच कॉंग्रेस पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते महाराष्ट्राच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी कॉंग्रेस पक्षाचे जनसंपर्क अभियान प्रभावीपणे राबविणार आहेत

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget