सावता परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने


नगर । प्रतिनिधी -
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे स्मारक व ओबीसी आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी सावता परिषदेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काल (बुधवार) राज्यभर निदर्शने करण्यात आली. नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदेश महासचिव मयूर वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष निखिल शेलार, उपाध्यक्ष गणेश बनकर, कार्याध्यक्ष सावता हिरवे, संपर्कप्रमुख राहुल वैद्य, तालुकाध्यक्ष महादेव खंदारे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुसे, चरणसिंग परदेशी, नितीन डागवाले, अमोल नांगरे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाजक्रांतीचे अग्रदूत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवावे. जातीनिहाय जनगणना करुन आकडेवारी जाहीर करावी. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करावा. महिला व बहुजन शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून पाळण्यात यावी. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगांव (जि. सातारा) येथे सावित्रीसृष्टी निर्माण करावी. तसेच मुलींची पहिली शाळा सुरू झालेल्या पुणे येथील भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे. ओबीसी मंत्रालयामार्फत ओबीसी शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासाठी योजना तयार करुन त्याची अंमलबजावणी करावी. ओबीसी वित्त व विकास महामंडळाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 500 कोटींची भरीव आर्थिक तरतूद तात्काळ करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची व्यवसाय अभ्यासक्रमाची बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी. स्थगित करण्यात आलेली मेगा नोकरभरती तातडीने करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
या मागण्यांचा विचार न झाल्यास सावता परिषदेच्यावतीने तीव्र स्वरुपात लढा उभारण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी गणेश फुलसौंदर, प्रवीण जाधव, सुनील गायकवाड, अभिषेक पडोळे, रोहित सुरतवाले, सचिन नांगरे, संतोष पुंड, ऋषीकेश रासकर, खंडू मेहेर, प्रमोद पुंड, प्रकाश मेहेर, संदेश पानसरे, राजू नगरे, गणेश माळी, नवनाथ खामकर, सागर उबाळे, शुभम हजारे, अभिषेक कोथिंबीरे, सागर चौरे, बदामराव पंडित यांच्यासह सावता परिषदेचे जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget