Breaking News

एम.ई.एस. बिल्डर्स असोसीएशन इंडिया, ठेकेदारांचा नगरमध्ये संप , कामबंद आंदोलन


नगर- भिंगार रोड गँरीसन इंजिनीअरिंग अहमदनगर कार्यालय येथे एम.ई.एस. बिल्डर्स असोसीएशन इंडिया नासिक ब्रेंचच्या अहमदनगर शाखे मधील सर्व ठेकेदारांनी थकीत बिलांच्या मागणीची पूर्तता न झाल्याने बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले. यावेळी उपाध्यक्षप्रमोद भालवनकर,सहसचिव एम.डी.ओटी ,रमेश कोल्हे,हरीश सूद,मणिलाल पटेल, अंजुम शेख,मेअर पठान,हबीब पठान,बशीर खान,जवाहर मुथा,विकास जगताप सुधीर मोटा,रियाज सालुजी ,हुजेपा सालुजी,पाटोळे,श्रीकांत सोमाणी,प्रदीप ठुबे,कुर्बान शेख,खलील सय्यद,मोहन भुजबळ,राम जरांगे आदी सहभागी झाले होते.

एम.ई.एस.विभागामध्ये आज पर्यंत देशभरात २२०० कोटीची व एस.कमांड पुणे यांच्या कडे ५०० कोटींची ठेकेदारांची थकीत बिले आहेत. तर नगर मध्ये जवळ जवळ१५ कोटीची बिले गेल्या चार महिन्या पासून थकीत आहेत.यासाठी सर्व ठेकेदारांनी संपाची नोटीस दिल्यानंतर ३१आँक्टोंबर पर्यंत बिले देण्याचे कबूल करण्यात आले होते.परंतु आजपर्यंत बिले न मिळाल्याने एम.ई.एस. बिल्डर्स असोसीएशन इंडिया नासिक ब्रेंचच्या अहमदनगर मधील सर्व ठेकेदारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.भिंगार रोडवरील किल्ल्या समोरील एम.ई.एस.कार्यालयासमोर ठेकेदार व कामगारांनी निदर्शने केली व गँरीसन इंजिनीअरिंग दक्षिण विभाग अधिकारी दीपक ठाकूर व उत्तर विभाग पारस महेश्वरी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

माहे जुलै पासून बिले थकल्याने ठेकेदारांनाहि मजुरी देताना व सप्लायर्स यांना देणी देणे शक्य होत नाही.दिवाळी मध्ये त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणीना तोंड द्यावे लागत असून यावर लवकरच तोडगा निघावा यासाठी आंदोलना शिवाय पर्यायच उरला नाही. एम.ई.एस.मध्ये बजेट शिवाय कोणतेही काम काढले जात नसताना अशी परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार होणे गरजेचे आहे.आज पर्यंतचे पेमेंट त्वरित व्हावे तरच काम बंद आंदोलन मागे घेतले जाईल असे असोसीएशनचे म्हणणे आहे.