नातेवाईकांना भेटू न दिल्याच्या रागातून आरोपीने फोडले गाडीचे तिघा आरोपींवर गुन्हा दाखल काच;


ठाणे वार्ताहर

मुंबईच्या न्यायलयात सेशन कोर्टात हजर करण्यासाठी नेलेल्या 18 आरोपीपैकी परतीच्या प्रवासात तिघा आरोपींनी रागाच्या भरात गाडीची 1500 रुपयांची काच फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी तीन जणांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणायत आलेला आहे.


फिर्यादी अशोक शंकर भालेराव (57) रा. ठाणे शहर पोलीस लाईन, जुनी बैठी चाळ, जरीमरी मंदिरा समोर, ठाणे हे 5 टनी फिजर व्हेन गाडीत 12 आरोपींना 18 सुरक्षा गार्ड सह मुंबई सेशन न्यायलयात तारखेला हजर करण्यासाठी मुंबईच्या न्यायलयात नेण्यात आले होते. न्यायलयात सुनावणी नंतर न्याय्ल्याच्या बाहेर उभे असलेल्या आरोपींच्या नातेवाईकांना पोलिसांनी भेटू दिले नाही. याचा राग मनात धरून आरोपी सुशांत रमेश लाखान, बाळू रमेश ससाणे आणि राकेश सुरेश माळी या तिघा आरोपींनी ठाण्याच्या तीनहात नाका परिसरात गाडीचे तीन डीम लाईट आणि त्यावरील आवरण तोडून टाकीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकरणी सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget