किसन वीर कारखान्याचा गळीत हंगाम उद्यापासून सुरु


सातारा (प्रतिनिधी) : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2018-19 च्या 48 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर यांच्या हस्ते  होणार असल्याची माहिती अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली. 

यंदाचा 2018-19 चा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्धार व्यवस्थापनाने केलेला असुन या हंगामात आठ लाख मेट्रिक टनाचे गळिताचे उद्दिष्ठ व्यवस्थापनाने ठेवलेले आहे. त्यादिशेने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आलेली आहे. किसन वीर साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक, कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव व संचालक मंडळाने केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget