गाळा जप्ती कारवाई थांबविण्यासाठी २ हजाराची लाच घेताना अटक


ठाणे : प्रतिनिधी
ठाणे जिल्हा को-ओपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनच्या विशेष वसुली आणि कर विक्री अधिकाऱ्यास गाळ्याच्या जप्तीची कारवाई थांबवण्यासाठी 2 हजाराची लाच स्वीकारताना एसीबी पथकाने शुक्रवारी अटक केली. नितीन तुकाराम बने असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार यांच्या बहिणीच्या नावे कल्याण येथे एक गाळा असून या गाळ्यावरील जप्तीची कारवाई थांबवण्यासाठी जिल्हा जिल्हा को-ओपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनचे विशेष वसुली व कर विक्री अधिकारी नितीन बने यांनी 2 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता सदर अधिकाऱ्याने लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबी पथकाने सापळा लावून बने यांना 2 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी एसीबीच्या पोलीस निरीक्षक सीमा आडनाईक अधिक तपास करीत आहेत

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget