तमीजबी शेख यांना आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार


राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यातील कणगर खुर्द येथील अंगणवाडी मदतनीस तमीजबी अजिज शेख यांना आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

जिल्हा परिषदेच्या वतीने संपन्न झालेल्या आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार सोहळ्यात शेख यांना पालकमंत्री ना. राम शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील, उपाध्यक्षा राजश्री घुले, महिला बालकल्याण समिती अध्यक्षा अनुराधा नागवडे, कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, जिल्हा परिषद पदाधिकारी राहुरी पंचायत समिती सभापती मनिषा ओव्हाळ, प्रकल्प अधिकारी कल्हापुरे, ढोकणे आदी उपस्थित होते. तमीजबी शेख या आठ वर्षांपासून सेवेत आहेत. या पुरस्कारबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget