दीपावलीच्या धामधुमीत एसटी बस झाली दे धक्का !

शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुका विकासाची एक मोठी बाजारपेठ आहे. त्यातच वर्षातला सर्वात मोठा सण असल्याने शेवगाव शहरामध्ये सर्वच रस्ते माणसांनी फुलून गेली आहेत बाजारपेठांमध्ये सध्या एकच लगबग पहावयास मिळत आहे, नेवासा रोडवर धूत जिनींग प्रेसच्या मागील मैदानावर प्रशस्त अशा जागेवर फटाका मार्केट उभारून प्रशासन व नगरपालिकेने ग्राहकांची सोय होईल असे स्वतंत्र दालन खुले करून दिले आहे. त्यामुळे नेवासा रोडवर तालुक्यातील येणार्‍या माणसांची गर्दी अधिकच भर घालत आहे. त्यातच तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती असतानाही दीपावलीचा सण हा घराघरातील उत्साह वाढवणारा व कुटुंबाला एकत्रित करणारा सण असल्याने या सणाचा उत्साह दुष्काळामुळे काहीसा कमी झाला असला तरी बाकी उत्साह टिकून आहे कापड मार्केट होलसेल किराणा दुकानेही माणसांनी फुलली आहेत. 

अशातच एसटी महामंडळाची नेहमीच चर्चेत असणारी बससेवा दिपवालीच्या ऐन उत्साहाच्या वातावरणात असणार्‍या लोकांच्या आनंदात विरजण घालून जाते आणि शेवटी म्हणावी लागते एन दिपवालीच्या धामधुमीत एसटी बसला दे धक्का या धक्क्याला एसटी कर्मचार्‍यांची इतर ये-जा करणार्‍या पादचारी व्यक्तींना विनवणी म्हणजे एसटी महामंडळाची बस ह्या आधुनिक हव्यात अशी सामान्य प्रवाशांची इच्छा आहे. अशी इच्छा ही अधिकारीवर्गाच्या कर्मचार्‍यांसह सर्वांचेच बोलण्यातून आता कंटाळा येतो ह्या गाड्यांचा असे ऐकावयास मिळाले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget