४८० ग्राम अंमली पदार्थ चरससह एकास अटक

ठाणे : प्रतिनिधी

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या 45 वर्षीय इसमाला 480 ग्राम चरस अंमली पदार्थासह ठाण्याच्या अशोक सिनेमा रोडवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी 3-15 वाजण्याच्या सुमारास अटक केली.


अटक आरोपी समशाद अली मजीद अली सय्यद (45) रा. सय्यद नगर, प्रेम नगर, झाशी उत्तरप्रदेश हा मंगळवारी दुपारी अशोक सिनेमाच्या परिसरात संशयित रित्या फिरत होता. त्याने सोबत विक्री करण्यासाठी चरस हा अंमली पदार्थ आणल्याची माहिती गुन्हे शाखेचे अंमली विरोधी पथकाचे महादेव खंडेराव चाबुकस्वार( 39) यांना माहिती मिळताच त्यांनी संशयित सय्यद याला हटकले आणि त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे 480 ग्राम चरस, 500 रुपयांची रोकड, झाशी ते कल्याण रेल्वेचे तिकीट, सिमकार्ड असा 96 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget