Breaking News

बाळमावळे किल्ले बांधणीत मग्न


खटाव (प्रतिनिधी) : दिवाळी अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपली आहे. बहुतांशी शाळांच्या परिक्षा शुक्रवारी संपल्या असून बाळ मावळ्याना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे आता बाळमावळे किल्ला बांधण्यात मग्न झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

गावोगावी व शहरात ही बाल मावळे चिखल माताशी एकरूप होऊन ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारू लागले आहेत. त्यामुळे दारोदारी छत्रपती शिवरायांचा इतिहातच साकारू लागला आहे. 
घरापुढील मोकळ्या जागेत व अंगणात जिथे जागा मिळेल तिथे साक्षात अजिंक्यतारा, प्रतापगड, सिंधुदुर्ग, रायगड, सिहगड अशा विविध किल्यांच्या प्रतिकृती तयार केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. किल्यांच्या पुढे विविध सुशोभीकरण कण्यासाठी विविध शक्कल देखील बाळ मावळे लढवत आहेत. किल्यांच्या प्रतिकृती पुढे मोकळ्या सलाईनच्या पाईपचा वापर करून कारंजे तयार करण्यात आले आहेत. तसेच किल्याच्या पुढे हिरवळ दिसावी यासाठी मोहरी, हळीव टाकून हिरवळ तयार केली आहे. त्यामुळे शक्कल लढवत प्रत्येक बाळमावळा किल्ले आकर्षक बनविण्याच्या कामात मग्न आहेत.