पंतप्रधान पीक विमा योजना राफेलपेक्षाही मोठा घोटाळा; केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर पी. साईनाथ यांची टीका


मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजना हा राफेल घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले. ते अखिल भारतीय किसान संषर्ष समन्वय समितीच्या बैठकीमध्ये मुंबई येथे बोलत होते. दरम्यान त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर टीकात्मक मांडणी केली. रिलायन्स इश्योरन्स कंपनीने एकाच जिल्ह्यात सोयाबीन पीकामध्ये 145 कोटींचा घोटाळा केला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नावाखाली केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकर्‍यांच्या वाट्याचे कोट्यवधी रुपये हडप केले आहेत, असा आरोप पी. साईनाथ यांनी केला. देशभरातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारे सुस्तावली आहेत. म्हणून सरकारला जागे करण्यासाठी देशभरातून अनेक शेतकरी 18 ते 30 नोव्हेंबरला संसदेला घेराव घालतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

रिमोट सेंसिंग आणि 2016 च्या दुष्काळ संहितेने शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. या संहितेमध्ये दुष्काळावर अपील करण्याची शेतकर्‍याला मुभा नाही, असेही साईनाथ यावेळी म्हणाले. शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे. तसेच राज्य सरकारांनीही विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी डॉ. अशोक ढवळे यांनी या बैठकीत केली. शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर शेतकर्‍यांना कर्जमुक्त करावे. तसेच स्वामिनाथन यांच्या शिफारसीनुसार शेतमालाला दीड पट हमीभाव द्यावा. या मागण्यांसाठी 18 ते 30 नोव्हेंबरला दिल्लीयेथे संसदेचा घेराव घालण्यात येणार आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget