Breaking News

सभापती देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त गरजुंना ब्लँकेट,ड्रेस,साड्यांचे वाटप


अंबाजोगाइ (प्रतिनिधी)-हल्ली वाढदिवस असो अथवा लग्न समारंभ अफाट अनावश्यक खर्च करण्याची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे.परंतु या सर्व बाबीना अपवाद ठरलेत बीड जिल्ह्याचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख. यांचा वाढदिवस त्यांच्या स्नेही जणांनी करण्याचे ठरवले खरे पण राजेसाहेब देशमुख यानी काही अटीवर वाढदिवस साजरा करण्याचे सांगितले आणि त्याप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याचे संजय काळे यांनी ठरवले.लाडक्या नेत्याचा वाढदिवस मोठया दिमतीने नाविन्यपूर्ण उपक्रमात साजरा करण्यात आला. अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील गरजूंना कपडे, साड्या,ब्लँकेट देण्यात आले याच बरोबर आरोग्य विभागाच्या सहकार्यातून आरोग्य शिबीर घेण्यात आले. 


या शिबिरामध्ये शंभर नागरिकांची शुगर, ब्लडप्रेशर, रक्त-लघवी आदी तपासण्या करण्यात आल्या.तालुक्यातील कोळकानडी येथील ६० गरजू विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप तसेच गावातील विधवा महिलांना ५० साड्यांचे वाटप राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. मोरेवाडी येथील त्यांच्या कार्यालयासमोर देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी सद्या थंडीचे दिवस असल्याने मायेची गरम उब मिळावी या हेतूने ५१गरजवंताना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तसेच अपंग दिना दिवशी (१डिसेंबर) २०१अपंग विद्यार्थ्यांना ड्रेस देण्याचे ठरवण्यात आले. त्यातील उपस्थित काही विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात आले.यामुळे राजेसाहेब देशमुख यांनी अनावश्यक खर्च टाळून विधायक कामातून वाढदिवस साजरा केला असल्याने त्यांचे आणि आयोजक संजय काळे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.