Breaking News

मुकबधीर विद्यार्थ्यांसोबत पोलिसांची अनोखी दिवाळी


बुलडाणा,(प्रतिनिधी)ः येथील मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फराळाचा आस्वाद घेत शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक यु. के. जाधव यांच्याकडून पोलीस दला बाबतची माहिती विशीष्ट सांकेतिक भाषेत समजावून घेतली. विशेष म्हणजे एलसीडीद्वारे पोलिसांचे प्रात्यक्षिकही या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. त्यामुळे बुलडाणा येथील मुकबधीरांना यंदाचा दीपोत्सव ‘गोडवा’ अनुभवला. निमित्त होते बुलडाणा शहर पोलिसांच्यावतीने मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी आयोजित दीपावली मेळाव्याचे. फराळाचे विविध मेनू अन ठाणेदार यु. के. जाधव यांच्या गमतीदार गप्पांनी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच रंगत वाढली होती. तर मूकबधीर विद्यार्थ्यांसह त्यांच्या शिक्षकांनीही पोलिसांमधील माणूसपणाचा अनुभ घेतला.

बुलढाणा येथील मुकबधीर विद्यालयातील सुमारे 70 विद्यार्थ्यांसह त्यांचे मुख्याध्यापक, विशेष शिक्षक आणि शिक्षिकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. पोलिसांच्या या आपुलकीच्या पाहुणचारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकही भारावले. फराळासोबतच सांकेतिक भाषेद्वारे चिमुकल्या पाहुण्यांना पोलीस दलाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी एपीआय यादव, हे.कॉ. चव्हाण, हे.कॉ. पवार, महिला पोलीस बामन्दे, अमोल सेजव, पडघान, गजानन लहासे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तर मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद पारवे, रंजना वारे, इंगळे, सुनिता पुट्टी, बहाळस्कर, ठाकरे, कविश्‍वर, रिंढे आदींची या सोहळ्याला उपस्थिती होती. पोलिसांमध्येही संवेदनशील माणुस असतो, याचा प्रत्यय याप्रसंगी शिक्षकांना आला.