तांत्रिक प्रशिक्षित बेरोजगार संस्थेस आय एस.ओ. मानांकन


देेवळा : देेवळा येथील महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था लि.महाराष्ट्र राज्य या संस्थेचे कामकाज, माहितीचा अद्यावत लेखाजोखा, फाईली व कागदपत्रकांची मांडणी आदी गुणवैशिष्ट्यांमुळे या संस्थेला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती संस्थापक भाऊसाहेब पगार यांनी दिली.

नाशिक व देवळा येथील दोन्ही कार्यालयांची विभागनिहाय केलेली रचना यामुळे येथील कामांचा निपटारा जलद होतो. रोजगार मिळू शकतील अशा सर्व रिक्त जागांची माहिती तसेच बेरोजगारांची सविस्तर माहिती यामुळे रोजगार मिळवून देण्यात व तसे कामकाज करण्यास सोपे जाते. विविध शासकीय व अशासकीय संस्थांना कामकाजासाठी मनुष्यबळ लागते. त्यात प्रशिक्षितांसह अप्रशिक्षितांनाही मागणी असते. 

कामासाठी मनुष्यबळाची गरज असलेल्या संस्था आणि ज्यांना काम हवे आहे असे बेरोजगार तरुण यातील दुवा म्हणून हि संस्था काम करते. त्यासाठी लागणारी सर्व माहिती अद्यावत ठेवणे, संबंधितांच्या संपर्कात राहणे, योग्य व कामसू उमेदवारांची निवड करणे आदि प्रक्रिया संस्थेमार्फत राबविल्या जातात. सीसीटीव्ही कॅमेरे, बैठकरचना, डाटा संकलन, इंटरनेट सुविधा, संगणकीकरण यामुळे सर्व सुविधा येथे दिसून येतात. अध्यक्ष संजय निकम, व्यवस्थापकीय संचालक राजीव पगार, सचिव दिनेश पगार,संचालक किरण आहेर ,सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बदल करण्यात आले. या सगळ्या बाबींची दखल घेतल्याने या संस्थेला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळण्याचा मान मिळाला आहे.
"आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करत आहोत. त्यात कामकाजात सुसूत्रता यावी म्हणून तसेच कार्यालयातील वातावरण फ्रेश राहावे म्हणून काही सोयी-सुविधा उपलब्ध करून घेतल्या. यामुळे सर्व स्टाफ आनंदी व ताणतणाव रहित असतो. यातून आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाल्याचा आनंद आहे." ----------भाऊसाहेब पगार संस्थापक 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget