Breaking News

म्हसवड येथून बुलेटची चोरी


म्हसवड (प्रतिनिधी) : येथील शिक्षक कॉलनी येथून घरासमोर लावलेली अविनाश माणिकराव उंदरे यांची काळ्या रंगाची बुलेट अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबतची फिर्याद बुलेटचे मालक अविनाश माणिकराव उंदरे म्हसवड पोलिसात दिली आहे. अविनाश उंदरे हे म्हसवड येथील शिक्षक कॉलनी येथे राहात असून त्यांनी त्यांची 55 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बुलेट मोटरसायकल अज्ञात चोरट्याने घराच्या गेटसमोरून चोरून नेली. घटनेचा अधिक तपास सोरटे करत आहेत.