Breaking News

गौरी सोळंकेची ’खेलो इंडिया’ साठी निवड


मलकापूर,(प्रतिनिधी): कटक ओडिशा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय सबज्युनियर तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत मलकापूर येथील रौप्य पदक व कांस्य पदक मिळवणार्‍या गौरी मंगलसिंग सोळंके हिच्या कौशल्यपूर्ण खेळ प्रदर्शनामुळे तिची ’खेलो इंडिया’ साठी निवड करण्यात आली आहे. गौरी सोळंके हिने सांघिक खेळ प्रकारात कांस्य तर वैयक्तिक रौप्य पदक पटकावले. ही निवड चाचणी रायपूर येथे 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर व बुलडाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या अंतर्गत प्रशिक्षण घेणारी व निवड झालेली गौरी सोळंके ही पहिली खेळाडू ठरलेली आहे. गौरी सोळंके हिने आजतागायत सबज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत एकल व सांघिक खेळामध्ये तिने कांस्य पदक तसेच औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय राज्य स्पर्धेत वैयक्तिक सेबर या प्रकारात रौप्य पदक पटकावले आहेे. तिला स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे सचिव विजय पळसकर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभत आहे.

गौरी सोळंके हिने आपल्या या यशाचे श्रेय आई, वडील, प्रशिक्षक, भारतीय तलवारबाजी संघटनेचे खजिनदार अशोक दुधारे, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ.उदय डोंगरे, बुलडाणा जिल्हा संघटनेचे सचिव शेषनारायण लोंढे, स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे सचिव विजय पळसकर, प्रा. नितीन भुजबळ यांना दिले आहे. गौरी सोळंके हिला सरावात मदत व मार्गदर्शन करणार्‍यांमध्ये अजय त्रिभुवन, निखिल गलवाडे, अक्षय गोलांडे, विवेक जाधव आदींचा सहभाग असून तिच्या या यशाबद्दल बुलडाणा जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव शेषनारायण लोंढे, सन्मती जैन, नगरसेवा समितीचे अध्यक्ष दामोदर लखानी, जयंत राजूरकर, क्रीडा शिक्षक जी.टी तायडे आदींनी कौतुक केले असून तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.गौरी सोळंकेची ’खेलो इंडिया’ साठी निवड मलकापूर,(प्रतिनिधी): कटक ओडिशा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय सबज्युनियर तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत मलकापूर येथील रौप्य पदक व कांस्य पदक मिळवणार्‍या गौरी मंगलसिंग सोळंके हिच्या कौशल्यपूर्ण खेळ प्रदर्शनामुळे तिची ’खेलो इंडिया’ साठी निवड करण्यात आली आहे. गौरी सोळंके हिने सांघिक खेळ प्रकारात कांस्य तर वैयक्तिक रौप्य पदक पटकावले. ही निवड चाचणी रायपूर येथे 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर व बुलडाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या अंतर्गत प्रशिक्षण घेणारी व निवड झालेली गौरी सोळंके ही पहिली खेळाडू ठरलेली आहे. गौरी सोळंके हिने आजतागायत सबज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत एकल व सांघिक खेळामध्ये तिने कांस्य पदक तसेच औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय राज्य स्पर्धेत वैयक्तिक सेबर या प्रकारात रौप्य पदक पटकावले आहेे. तिला स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे सचिव विजय पळसकर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभत आहे. गौरी सोळंके हिने आपल्या या यशाचे श्रेय आई, वडील, प्रशिक्षक, भारतीय तलवारबाजी संघटनेचे खजिनदार अशोक दुधारे, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ.उदय डोंगरे, बुलडाणा जिल्हा संघटनेचे सचिव शेषनारायण लोंढे, स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे सचिव विजय पळसकर, प्रा. नितीन भुजबळ यांना दिले आहे. गौरी सोळंके हिला सरावात मदत व मार्गदर्शन करणार्‍यांमध्ये अजय त्रिभुवन, निखिल गलवाडे, अक्षय गोलांडे, विवेक जाधव आदींचा सहभाग असून तिच्या या यशाबद्दल बुलडाणा जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव शेषनारायण लोंढे, सन्मती जैन, नगरसेवा समितीचे अध्यक्ष दामोदर लखानी, जयंत राजूरकर, क्रीडा शिक्षक जी.टी तायडे आदींनी कौतुक केले असून तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.