दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करा; ए.आय.एस.एफ चे भाजपा आ.ठाकुर यांना निवेदन


चौसाळा (प्रतिनिधी)- गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचे पप्रमाण अतिशय कमी असल्याने आपल्याकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. सरकारने अनेक भागात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकर्‍यांना कसलेही उत्पन्न झालेले नाही. कामगारांना काम नाही . म्हणून शेतकरी कामगार कष्टकरी यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहेत . त्यातच वाढत्या फिस चा मारा संस्थाचालक वारंवार करत आहेत.

 दुष्काळात कसलेच उत्पन्न नसल्याने सर्वसामान्य जनता विद्यार्थ्यांचे कसलेही शुल्क भरु शकत नाही व विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज ला जाण्यासाठी बस पास घेण्यासाठी पैसे नसतात म्हणून आपल्याच मराठवाड्यातील एक भगिनीने आत्महत्या केली होती. असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून या वर्षीचे सर्वच विध्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क माफ करून बस पास मोफत देण्यात यावेत ंया मागण्या करत ए.आय.एस.एफ कडुन पारगाव येथे भाजप आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या कडे निवेदन देण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget