Breaking News

सह्याद्रि कारखान्यास ऍनिमल राहत संस्थेच्या पदाधिकार्‍यांची सदिच्छा भेट


कराड (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्‍या ऍनिमल राहत या संस्थेच्या पदाधिकारी यांनी सह्याद्रि कारखान्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ऊस वाहतूकीच्या बैलगाडीमध्ये प्रमाणशीर ऊस भरावे, बैलांना अमानुष वागणूक देवू नये, त्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कारखान्याच्या बैलगाडी तळामध्ये जावून तेथील जागेची पाहणी केली व सह्याद्रि कारखान्याने बैलगाडी तळामधील स्वच्छता, बैलांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची केलेली व्यवस्था पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी अमेरिकेच्या इनग्रीड न्युक्रीक, पुर्वा जोशीपुरा, ब्रीटेनी, नायजेल ओटर व या संस्थेचे महाराष्ट्रातील आयुक्त डॉ.मनीलाल यांचेसह कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, शेती अधिकारी मोहनराव पाटील, जनसंपर्क अधिकारी विश्वास शेलार, डेप्यु.ऊस विकास अधिकारी संजय चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी नितीन साळुंखे आदि उपस्थित होते.