शाहूपुरीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न


सातारा (प्रतिनिधी) : शाहूपुरी येथील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. दरम्यान, एटीएम रूममध्ये असलेला सायरन वाजल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सागर सुरेश घाडगे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दत्तसाई अर्पाटमेंटजवळील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम मशीन शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एटीएम रूममध्ये असलेला सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget