Breaking News

पैठण राहुरी बसचे चांदा येथे उत्स्फुर्त स्वागत


नेवासा/प्रतिनीधी
नेवासा तालुक्यातील चांदा बसस्थानक येथे औरंगाबाद-पैठण-राहुरी बसचे सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्त स्वागत केले. गेल्या अनेक दिवसांपासून पैठण-राहुरी ही बससेवा सुरु व्हावी म्हणुन सोनई-घोडेगाव-चांदा-कुकाणा परीसरातील प्रवासी वर्गातुन मागणी होत होती. ही बस राहुरी येथे मुक्कामी येते. व सकाळी सोनई-घोडेगाव-चांदा-कुकाणा-शेवगाव मार्गे पैठणकडे मार्गस्त होते. 

त्यामुळे अनेक प्रवाशांनी पैठण आगार व्यवस्थापक सुहास तरवडे यांना धन्यवाद दिले. तसेच चांदा येथील सामाजिक कार्यकर्ते शामराव पवार, बाबासाहेब दहातोंडे, सोमनाथ धुमाळ, यांनी पैठण आगार प्रमुख तरवडे, तसेच वाहक देविदास भोजने, चालक बशिरभाई शेख यांचा श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन तसेच बसला हार घालुन स्वागत केले. यावेळी गणपत पुंड, किरण जावळे, देविदास चौरे, पिंटु जावळे, संदिप जावळे, फिरोज शेख, सुभाष जावळे, अय्युब सय्यद, मुक्तार शेख, सिताराम चौधरी, आदी ग्रामस्थ याप्रसगी उपस्थित होते. ही बस चालु केल्याबद्दल अनेक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.