Breaking News

रेल्वेच्या जीर्ण इमारतीचा भाग कोसळला आठ दुचाकींचे नुकसान नागरिकांमध्ये रोष


ठाणे : प्रतिनिधी

ठाणे स्थानकाजवळ रेल्वे च्या हद्दीत असलेल्या धोकादायक अवस्थेत जीर्ण झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या इमारतीचा काही भाग कोसळून 8 दुचाकींचे मोठे नुकसान झाल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. ठाणे स्थानकाला जाण्याचा हा मार्ग हजारो नागरिक दररोज वापरात असून अपघात झाला तेव्हा इमारतीच्या खाली कोणीही नसल्यामुळे या अपघातात कोणीही जखमी झालेली नाही . ठाणे स्थानकाला जागून असलेल्या या इमारती मागील अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहेत आणि त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे अनेक ठाणेकर याभागातून जाये करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. 

ठाणे स्थानकाच्या जवळ असल्यामुळे बिकेबीन भागातील रेल्वे क्वाटर्स खाली अवैध पार्किंग मोठ्या प्रमाणात होते याकडे पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे या ठिकाणी अवैध फेरीवाले देखील असतात याच अवैध पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या आठ दुचाकींचे आज झालेल्या अपघातात मोठे नुकसान झाले असून थाटनास्थळी पोहचून ठाणे अग्निशामक दलाने डेब्रिज हटवण्याचे काम केले. या इमारती मागील चार वर्षांपासून मोकळ्या असून त्या अतिजीर्ण झाल्यामुळे त्यांना पाडण्यात दिरंगाई होत आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात रोष वक्त केला असून जर या ठिकाणी कोणताही अपघात झाल्यास पालिका प्रशासन जवाबदार असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.