Breaking News

राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे श्री कांबळे यांच्या हस्ते उदघाटन


बीड, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड यांचे विद्यमाने व महाराष्ट्र बेसबॉल, बीड जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित १७ वर्षाखालील मुले व मुली या वयोगटातील राज्यसतर शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन दि. ०१ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११.०० वा. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा ध्वजारोहन करुन व क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमास औरंगाबाद विभागाचे क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी प्रा. जे. पी. शेळके, महाराष्ट्र बेसबॉल असो. कोषाध्यक्ष अशोक सरोदे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, क्रीडा मार्गदर्शक अजय पवार, संतोष वाबळे, राज्यस्तर स्पर्धा निवड समिती सदस्य ज्ञानेश काळे, आदि उपस्थित होते.