सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थे अंतर्गत केरोसिनचे सुधारीत दर निश्चित


              अहमदनगर दि.3 - शासनाने प्रत्‍येक पंधरवडयानंतर सुधारीत होणारे केरोसिनचे दर निश्चित करण्‍याबाबत जिल्‍हा पुरवठा कार्यालय, अहमदनगर यांना कळविले आहे.  त्‍यानुसार  राज्‍यस्‍तरीय समन्‍वयक तेल उद्योग यांचेकडून माहे  नाव्‍हेंबर 2018 चे  सुधारीत एक्‍स डेपो दर प्राप्‍त झाले आहेत.
 शासनाच्‍या आदेशानुसार माहे नाव्‍हेंबर, 2018 च्‍या केरोसिनचे सुधारीत एक्‍स डेपो दरनुसार   जिल्‍यातील सर्व तालुक्‍यातील केरोसिनचे घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ स्‍तरावरील विक्रीदर निश्चित करण्‍यात आलेले आहेत.  हे दर दिनांक 1  नोव्‍हेंबर 2018 पासून पुढील आदेश होईपर्यत अंमलात राहतील. अधिक माहितीसाठी जिल्‍हा पुरवठा कार्यालय, अहमदनगर येथे संपर्क साधावा असे  जिल्‍हा पुरवठा अधिकारी संदीप निचित  यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget