नक्षलग्रस्त भागातील तरुणी बनली एक दिवसाची राजदूत


नवी दिल्लीः झारखंडमधील नक्षलग्रस्त भाग जमशेदपूर गावची रहिवासी असणार्‍या 22 वर्षीय मुलीने संपूर्ण भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या निमित्ताने परी सिंहला नवी दिल्लीत एक दिवसासाठी ऑस्ट्रेलियाची राजदूत होण्याचा मान मिळाला. सुटाबुटात परी अत्यंत आत्मविश्‍वासात वावरताना दिसत होती. भारतातील ऑस्ट्रेलियाच्या राजदूत हरिंदर सिधू यांनी परीला उच्चायुक्त कार्यालयातील कामाची माहिती दिली. 
परी ग्रामीण भागात महिला सशक्तीकरण तसंच बालविवाह रोखण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचं काम करते. यामुळेच ॠप्लॅन इंडिया’कडून तिची निवड करण्यात आली. परीने मुलींच्या अधिकारासाठीही खूप काम केलं आहे. दिल्लीमध्ये ॠप्लॅन इंडिया’चे गुडविल अ‍ॅम्बेसिडर अनिल कपूर यांच्याकडून तिचा सन्मान कऱण्यात आला. मुलींसाठी काम केल्याबद्दल परीला यूथ चॅम्पिअन पुरस्कारही प्रदान करण्यात आला.मुलींच्या अधिकारांसाठी लढा दिल्याबद्दल ॠयूथ चॅम्पिअन फॉर गर्ल्स राईट अवॉर्ड’ही देण्यात आला.
Labels:

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget