चारा लागवडीसाठी अनुदान योजना


सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील कराड, खंडाळा, कोरेगांव, माण, फलटण, वाई या तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे चारा टंचाईची परिस्थिती उद्भवू शकते. या तालुक्यातील संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वैरण बियाणे व खते वितरण या योजनेअंतर्गत चारा वर्गीय पिके लागवड करण्याकरीता सदर तालुक्यामधून पशुपालक, शेतकरी यांचेकडून दि. 12 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहे.

या योजनेची अंमलबजावणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सातारा करणार आहेत. या योजनेकरिता लाभार्थीकडे चारा पिकाच्या लागवडीकरिता पुरेसे क्षेत्र (किमान 10 गुंठे) व सिचंन सुविधा (विहिर, शेततळे, बोअरवेल, कालवा) उपलब्ध असणे आवश्यक आहे. या योजना 100 टक्के अनुदानावर अनुज्ञेय आहेत. योजनेअंतर्गत प्रती शेतकरी, पशुपालकांना अनुदानाची किमान मर्यादा 460/- प्रती 10 गुंठे क्षेत्र व अधिकतम मर्यादा 4600/- रुपये प्रती हेक्टर आहे. या योजनेअंतर्गत मका (आफ्रिकन टॉल), ज्वारी (मालदांडी, फुले रुचिरा, पीकेव्ही क्रांती) या वैरण पिकांच्या बियाणांचा पुरवठा करण्यात येणार आहे. 

योजनेअंतर्गत बियाणांची किंमत वगळून उर्वरीत रक्कमेमधून लाभार्थी पशुपालकांना युरीया खताची खरेदी करणे आवश्यक आहे. बियाणांची किंमत वगळता उर्वरीत रक्कम पशुपालकांच्या बँकखात्यात जमा करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 12 नोव्हेंबरपर्यंत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत पंचायत समितीकडील पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget