शिवसेना नगरसेविकेच्या दीराला अटक


ठाणे : प्रतिनिधी

जमिनीच्या वादातून उद्भवलेल्या हाणामारीप्रकरणी ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेविका नम्रता घरत यांचा दीर अमर घरत याला सोमवारी कासारवडली पोलिसांनी अटक केली.त्याच्या विरोधात दंगल घडविणे आणि तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,या राड्यानंतर पळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका गटातील संजय जाधव याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

घोडबंदर येथील अोवळा भागात एका जमिनी कारणावरून राम एेनपुरे आणि अमर घरत यांच्यामध्ये वाद झाला होता. अमर घरत हा त्याच्या साथिदारांसह जमीनीवर कब्जा मिळविण्या गेला. तसेच त्याने जमीनीभोवती असलेले कुंपन आणि वाहनेही फोडली. यानंतर राम एेनपुरे आणि अमर या दोघांचा गट एकमेकांसमोर आला होता. मात्र, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस त्याठिकाणी दाखल झाले आणि जमावाला पांगवला. या घटनेनंतर काही तासांनी राम एेनपुरे याच्या गटातील संजय जाधव यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूही झाला होता. याघटनेनंतर एेनपुरे यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अमर घरत याला त्याच्या पाच साथिदारांसह अटक केली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget